कांदा लसूण मसाला

 साहित्य - ४ वाट्या धने, २ वाटी खोबऱ्याचे तुकडे, अर्धी वाटी तीळ, पाव वाटी जिरे, तीन चमचे शहजिरे, २ चमचे लवंग, दालचिनी चे बोटभर लांबीचे ४ ते ५ तुकडे, २ चमचे भरून हिंग, ५ते ६ तमालपत्र पाने , २ते ३ दगडफुले, १ चमचा भरून हळद पूड , अर्धी वाटी तिखट, पाव वाटी मीठ, अर्धा किलो कांदे, २ मोठे गड्डी लसूण, एक वाटी लाल तिखट, एक वाटी कोथिंबीर , ३ वाट्या तेल
कृती : -तीळ भाजून घ्यावे, खोबरे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे, नंतर त्याच तेलात लवंग, दालचिनी, जिरे, शहाजिरे तमालपत्र, दगडफुल,मोहरी, धने एक एक करून तळावे, तीळ खोबरे हिंग बारीक करावे, नंतर तळून घेतलेले साहित्य बारीक करून चाळणीने चाळून घ्यावे, त्यात तिखट हळद मीठ मिसळावे, एकदा मिक्स करावे, कांदे चिरून ऊन्हात सुकवावे, सुखलेला कांदा, खोबऱ्याचे तुकडे , लसणीच्या पाकळ्या तेलात brown रंगावर तळून घ्यावे. सगळं साहित्य एकत्र करावे, लाल तिखट वार कोथिंबीर घालून तळून उरलेले तेल घालावे, मिक्स करून, ते मिश्रण मसाल्यात घालावे,
टीप :- वर्षभर टिकण्यासाठी हवा बंद डब्यात भरावे.
ओलसर पणा नसावा..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Instant Jilebi