शिल्लक राहिलेल्या भाजी पासून बनवा भन्नाट नाश्ता

साहित्य - 1/2 वाटी राहिलेली भाजी, 1 वाटी गव्हाच पीठ, 1     चम्मच तिखट, 1/2 चम्मच हळद, चवीनुसार मीठ, तेल

कृती - भाजीमध्ये गव्हाच पीठ तिखट हळद मीठ टाकून भिजुन घ्या.. थोडे घटसर भिजवा म्हणजे तव्यावर पराठा थपता यावा इतपत.. पीठ भिजुन झाले की तवा गरम करायला ठेवावा.. तवा व्यवस्थित गरम झाल्यावर गॅस ची आच कमी करावी.. तव्यावर थोडे तेल घालावे आणि थालिपिठ थापावे.. थापताना थोड हाताला पाणी लावावे म्हणजे थालिपिठ नीट थापता येईल आणि हाताला गरम लागणार नाही.. थोडी बाजूने तेल लाऊन खमंग भाजून घ्यावा.. हा पराठा चटणी दही किंवा तसाही छान लागतो..

टीप - 1. पीठ जास्त पातळ करू नये..
        2. थालिपिठ मध्यम आचेवर भाजावा..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कांदा लसूण मसाला

Instant Jilebi