गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक
पारी साठी साहित्य - 11/2 वाटी गव्हाच पीठ, मीठ, तेल
तळण्यासाठी तेल..
कृती - सारण बनवण्यासाठी फ्राय पॅन किंवा कढई मध्ये 1 चम्मच तूप घालून खोबरे आणि गूळ घालावा.. गूळ वितळून पुन्हा घट्ट होतो .. हे सारण 15 मी शिजून घ्यावे. गॅस ची आच मध्यम ठेवावी..सारण शिजून थंड होईपर्यंत पारीची कणीक मळून घेऊ.. त्यासाठी परातीत कणीक मीठ तेल घालून आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून पीठ घट्टसर (पुरी साठी मळतो तसे ) मळून घ्यावे.. 10 मी झाकून ठेवावे... आता मोदक करायला सुरुवात करुया.. लिंबाएवढा कणकेचा गोळा घेऊन त्याची पुरी लाटावी व त्याला पाकळ्या करून त्यात सारण भरावे व हलक्या हातानी मोदक बंद करावा ... सगळे मोदक तयार झाले की एका कढई मध्ये पाणी उकळायला ठेवावे पाणी उकळ्या नंतर त्यात जाळीदार ताट ठेऊन त्यावर मोदक ठेवावे वरून झाकण ठेऊन 15,20 मी वाफवून घ्यावे..
मोदक तयार आहे बाप्पाला नैवद्य दाखवण्यासाठी..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा