लसुण चटणी
वेळ :- १० मिनीटे
साहित्य :- २०,२५ लसूण पाकळ्या, तेल २ मोठे चम्मच, धने पावडर १/२ चम्मच, जिरे १/२ चम्मच , दही २ मोठे चम्मच, मीठ चवीनुसार, पाणी..
कृती :- लसूण पाकळ्या सोलून जाडसर ठेचून घ्याव्या... एका वाटी मध्ये तिखट धने पावडर आणि पाणी घालून पेस्ट बनवून घ्यावी.. कढई मध्ये तेल घालून जिरे घालावे जिरे तडतडले की ठेचलेला लसुण घालावा मध्यम आचेवर सोनेरी रंगावर परतून घ्यावा... नंतर तिखट पेस्ट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ३ मिनीटे शिजवून घ्या.. नंतर दही घाला आणि मीठ घालुन १ मिनिट शिजवावे.. गॅस बंद करावा.. लसूण चटणी तयार आहे..
टीप :-
१. चटणी साठी लसूण ठेचून च वापरावा..
२. मसाल्याची पेस्ट बनवा म्हणजे मसाले तेलामध्ये जळत नाही...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा