बटाटा गुलाबजाम
तयारी :- ३० मिनीटे
वेळ :- ३० मिनीटे
किती लोकांसाठी :- २
साहित्य :- ३ मध्यम आकाराचे बटाटे , २ मोठे चम्मच मिल्क पावडर, १ वाटी साखर , १/२ वाटी पाणी, वेलची पूड..
कृती :- बटाटे उकडून सोलून घ्यावे.. किसनी वर खिसून घ्यावे.. मिल्क पावडर मिसळून गोळा बनवावा . निंबुच्या आकाराचे गोळे बनवुन सोनेरी रंग येईपर्यंत तेल / तूप मध्ये तळून घ्यावे.. गरम असतानाच पाकात टाकावे.. १/२ तासानंतर खाण्यासाठी घ्यावे.. म्हणजे गुलाबजाम पाकमध्ये नीट मुरतील.
साखरेचा पाक :- एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करावे . मोठ्या आचेवर एक उकळी आली की गॅस ची आच मध्यम करावी आणि ५ मिनीटे उकळू द्यावे.. त्यात वेलची पूड घालावी ...
बटाटा गुलाबजाम तयार आहे ..
टीप :-
१. बटाटा उकडून सोलून १ तासांनी वापरावा म्हणजे चिकट होत नाही .
२. गुलाबजाम मध्यम आचेवर तळावे ..
३. साखरेचा पाक चीपचीपा हवा.. एक तारी किवा २ तारी नको ..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा