गाजर हलवा
तयारी :- १५ मिनीटे
वेळ :- ३० मिनीटे
किती लोकांसाठी :- ४
साहित्य :- गाजर १ किलो, दूध पाऊण लिटर , तूप ३ मोठे चम्मच, साखर पाव किलो, सुकामेवा, वेलची पूड..
कृती :- गाजर स्वच्छ धूऊन वरचे साल काढून किसणी वर किसून घ्यावे.. एका जाड बुडाच्या पातेल्यात एक चम्मच तूप टाकून गाजराचा कीस घालावा.. गॅस ची आच मध्यम ठेवावी.. ३ मिनीटे परतून झाल्यावर परत एक चम्मच तूप घालावे.. २ मिनीटे मध्यम आचेवर परतावे.. त्यात दूध घालून मध्यम आचेवर ५ मिनीटे शिजवून झाल्यावर त्यात साखर घालावी.. साखरेला पाणी सुटेल.. साखर घट्टआणि दूध आटवून गाजर हलवा थोडा घट्ट व्हायला आला की त्यात सुकामेवा आणि वेलची पूड घालावी .. वरून एक चम्मच तूप घालावे.. आणि परत पूर्ण घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे... गाजर हलवा तयार आहे..
टीप :-
१. पूर्ण गाजर हलवा मध्यम आचेवर शिजवावा..
२. दूध ऐवजी खवा सुधा वपरू शकता..
३. सुकामेवा थोड्या तुपावर परतून घेऊ शकता.
४. साखरेचा प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा