लाल माठ भाजी
तयारी :- १५ मिनीटे
वेळ :- १० मिनीटे
किती लोकांसाठी :- २
साहित्य :- १ जुडी लाल माठ भाजी, १ मोठा कांदा, ४,५ लसूण पाकळ्या, २ हिरवी मिरची, २ चम्मच तेल, १ चम्मच जिरे, १ चम्मच मोहरी, चिमुटभर हिंग, लाल तिखट (आवडीनुसार), हळद, मीठ (चवीनुसार)..
कृती:- लाल माठ भाजी निवडून (फक्त पाने आणि कोवळी देठ) स्वच्छ धूऊन बारीक चिरून घ्यावी.. कढई मध्ये २ चम्मच तेल घालून तेल तापल्यावर जिरे मोहरी हिंग घालावा .. जिरे मोहरी तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा लसूण (किसून) हिरवी मिरची घालावी.. कांदा सोनेरी रंगावर झाला की त्यात लाल तिखट हळद घालावे.. गॅस मध्यम आचेवर करून भाजी घालून घ्यावी.. व्यवस्थित परतून घ्यावी झाकण ठेऊन मध्यम आचेवर ५ मिनीटे शिजवून घ्यावी.. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून परतून गॅस बंद करावा.. लाल माठ भाजी तयार आहे .
टीप:- कांदा न घालता फक्त लसूण घालून पण भाजी छान होते .
लसूण किसून घालावा..
मीठ शेवटी घालावे कारण भाजी शिजल्यावर आळते त्यामुळे मिठाच प्रमाण कमीजास्त होऊ शकते...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा