या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
कांदा लसूण मसाला
साहित्य - ४ वाट्या धने, २ वाटी खोबऱ्याचे तुकडे, अर्धी वाटी तीळ, पाव वाटी जिरे, तीन चमचे शहजिरे, २ चमचे लवंग, दालचिनी चे बोटभर लांबीचे ४ ते ५ तुकडे, २ चमचे भरून हिंग, ५ते ६ तमालपत्र पाने , २ते ३ दगडफुले, १ चमचा भरून हळद पूड , अर्धी वाटी तिखट, पाव वाटी मीठ, अर्धा किलो कांदे, २ मोठे गड्डी लसूण, एक वाटी लाल तिखट, एक वाटी कोथिंबीर , ३ वाट्या तेल कृती : -तीळ भाजून घ्यावे, खोबरे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे, नंतर त्याच तेलात लवंग, दालचिनी, जिरे, शहाजिरे तमालपत्र, दगडफुल,मोहरी, धने एक एक करून तळावे, तीळ खोबरे हिंग बारीक करावे, नंतर तळून घेतलेले साहित्य बारीक करून चाळणीने चाळून घ्यावे, त्यात तिखट हळद मीठ मिसळावे, एकदा मिक्स करावे, कांदे चिरून ऊन्हात सुकवावे, सुखलेला कांदा, खोबऱ्याचे तुकडे , लसणीच्या पाकळ्या तेलात brown रंगावर तळून घ्यावे. सगळं साहित्य एकत्र करावे, लाल तिखट वार कोथिंबीर घालून तळून उरलेले तेल घालावे, मिक्स करून, ते मिश्रण मसाल्यात घालावे, टीप :- वर्षभर टिकण्यासाठी हवा बंद डब्यात भरावे. ओलसर पणा नसावा..
Instant Jilebi
वेळ :- १ तास किती व्यक्तीसाठी :- ७ साहित्य:- ११/२ कप मैदा, ३/४ कप दही, ११/२ कप साखर, ११/२ कप पाणी, खाण्याचा रंग, केसर (optional) , खाण्याचा सोडा. कृती :- एका भांड्यामध्ये मैदा आणि दही मिक्स करून घ्या.. त्यामध्ये १/२ कप पाणी घालून व्यवस्थित मिश्रण बनवुन घ्या.. (इडली च्या मिश्रण प्रमाणे).. १० मिनीटे झाकून ठेवा.. तोपर्यंत साखरेचं सिरप बनवून घ्या . त्यासाठी एका कढई मध्ये साखर आणि पाणी घालून मोठ्या आचेवर साखर विरघळून घ्या.. नंतर उकळी आली की २ ते ३ मिनीटे उकळा.. खाण्याचा रंग टाका १ छोटा चम्मच ..साखर चीपचीपी वाटली पाहिजे... बोटाच्या सहायाने साखरेचं सिरप तपासून पाहा.. जिलेबी चे मिश्रण तयार झाले आहेत त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा घाला.. आणि पसरट कढई किंवा frypan मध्ये तेल तापायला ठेवावे.. जिलेबी करण्याची बॉटल, दुधाची पिशवी, पाण्याची बॉटल सुद्धा वापरू शकता.. बॉटल मध्ये जिलेबी चे मिश्रण टाकून जिलेबी तळयला घ्या.. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तळन घ्या आणि लगेच साखरेच्या सिरप मध्ये घाला.. ३,४ मिनीटे झाले की काढून घ्या.. जिलेबी तयार आहे .. टीप:- १. खाण्याचा सोडा चिमुटभर घालावा. सोडा जास्त...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा