कैरीची डाळ

किती वैक्तिसाठी :- ४
लागणारा वेळ :- १० मिनिटे

साहित्य :- १ वाटी चण्याची डाळ (भिजलेली), १ मध्यम आकाराची कैरी, २-३ हिरवी मिरची, साखर १ चमचा, मीठ चवीनुसार ..
फोडणीसाठी :- तेल १ चमचा, कढीपत्ता, हिंग (चिमुटभर), हळद..

कृती :- १ वाटी चण्याची डाळ, हिरवी मिरची, साखर, मीठ मिक्सर ला जाडसर वाटून घ्यावे.. एक वाटी मध्ये मिश्रण काढून घ्यावे.. त्यात किसलेली कैरी घालावी व एकजीव करून घ्यावे . फोडणीसाठी तडका भांड्यामध्ये तेल टाकावे तेल तापले की कढीपत्ता, हिंग, हळद घालावी.. ही गरम फोडणी वरील मिश्रण मध्ये घालावी.. एकजीव करावे..
कैरीची डाळ तयार आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कांदा लसूण मसाला

Instant Jilebi