पोस्ट्स

गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक

इमेज
साहित्य सारणासाठी - 2 वाटी खोवलेले ओले खोबरे, 1 वाटी गूळ, विलयची, जायफळ, तूप पारी साठी साहित्य - 11/2 वाटी गव्हाच पीठ, मीठ, तेल तळण्यासाठी तेल.. कृती - सारण बनवण्यासाठी फ्राय पॅन किंवा कढई मध्ये 1 चम्मच तूप घालून खोबरे आणि गूळ घालावा.. गूळ वितळून पुन्हा घट्ट होतो .. हे सारण 15 मी शिजून घ्यावे. गॅस ची आच मध्यम ठेवावी..सारण शिजून थंड होईपर्यंत पारीची कणीक मळून घेऊ.. त्यासाठी परातीत कणीक मीठ तेल घालून आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून पीठ घट्टसर (पुरी साठी मळतो तसे ) मळून घ्यावे.. 10 मी झाकून ठेवावे... आता मोदक करायला सुरुवात करुया.. लिंबाएवढा कणकेचा गोळा घेऊन त्याची पुरी लाटावी व त्याला पाकळ्या करून त्यात सारण भरावे व हलक्या हातानी मोदक बंद करावा ... सगळे मोदक तयार झाले की एका कढई मध्ये पाणी उकळायला ठेवावे पाणी उकळ्या नंतर त्यात जाळीदार ताट ठेऊन त्यावर मोदक ठेवावे वरून झाकण ठेऊन 15,20 मी वाफवून घ्यावे.. मोदक तयार आहे बाप्पाला नैवद्य दाखवण्यासाठी..

शिल्लक राहिलेल्या भाजी पासून बनवा भन्नाट नाश्ता

इमेज
साहित्य - 1/2 वाटी राहिलेली भाजी, 1 वाटी गव्हाच पीठ, 1     चम्मच तिखट, 1/2 चम्मच हळद, चवीनुसार मीठ, तेल कृती - भाजीमध्ये गव्हाच पीठ तिखट हळद मीठ टाकून भिजुन घ्या.. थोडे घटसर भिजवा म्हणजे तव्यावर पराठा थपता यावा इतपत.. पीठ भिजुन झाले की तवा गरम करायला ठेवावा.. तवा व्यवस्थित गरम झाल्यावर गॅस ची आच कमी करावी.. तव्यावर थोडे तेल घालावे आणि थालिपिठ थापावे.. थापताना थोड हाताला पाणी लावावे म्हणजे थालिपिठ नीट थापता येईल आणि हाताला गरम लागणार नाही.. थोडी बाजूने तेल लाऊन खमंग भाजून घ्यावा.. हा पराठा चटणी दही किंवा तसाही छान लागतो.. टीप - 1. पीठ जास्त पातळ करू नये..         2. थालिपिठ मध्यम आचेवर भाजावा..

कैरीची डाळ

इमेज
किती वैक्तिसाठी :- ४ लागणारा वेळ :- १० मिनिटे साहित्य :- १ वाटी चण्याची डाळ (भिजलेली), १ मध्यम आकाराची कैरी, २-३ हिरवी मिरची, साखर १ चमचा, मीठ चवीनुसार .. फोडणीसाठी :- तेल १ चमचा, कढीपत्ता, हिंग (चिमुटभर), हळद.. कृती :- १ वाटी चण्याची डाळ, हिरवी मिरची, साखर, मीठ मिक्सर ला जाडसर वाटून घ्यावे.. एक वाटी मध्ये मिश्रण काढून घ्यावे.. त्यात किसलेली कैरी घालावी व एकजीव करून घ्यावे . फोडणीसाठी तडका भांड्यामध्ये तेल टाकावे तेल तापले की कढीपत्ता, हिंग, हळद घालावी.. ही गरम फोडणी वरील मिश्रण मध्ये घालावी.. एकजीव करावे.. कैरीची डाळ तयार आहे .

कांदा लसूण मसाला

इमेज
  साहित्य - ४ वाट्या धने, २ वाटी खोबऱ्याचे तुकडे, अर्धी वाटी तीळ, पाव वाटी जिरे, तीन चमचे शहजिरे, २ चमचे लवंग, दालचिनी चे बोटभर लांबीचे ४ ते ५ तुकडे, २ चमचे भरून हिंग, ५ते ६ तमालपत्र पाने , २ते ३ दगडफुले, १ चमचा भरून हळद पूड , अर्धी वाटी तिखट, पाव वाटी मीठ, अर्धा किलो कांदे, २ मोठे गड्डी लसूण, एक वाटी लाल तिखट, एक वाटी कोथिंबीर , ३ वाट्या तेल कृती : -तीळ भाजून घ्यावे, खोबरे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे, नंतर त्याच तेलात लवंग, दालचिनी, जिरे, शहाजिरे तमालपत्र, दगडफुल,मोहरी, धने एक एक करून तळावे, तीळ खोबरे हिंग बारीक करावे, नंतर तळून घेतलेले साहित्य बारीक करून चाळणीने चाळून घ्यावे, त्यात तिखट हळद मीठ मिसळावे, एकदा मिक्स करावे, कांदे चिरून ऊन्हात सुकवावे, सुखलेला कांदा, खोबऱ्याचे तुकडे , लसणीच्या पाकळ्या तेलात brown रंगावर तळून घ्यावे. सगळं साहित्य एकत्र करावे, लाल तिखट वार कोथिंबीर घालून तळून उरलेले तेल घालावे, मिक्स करून, ते मिश्रण मसाल्यात घालावे, टीप :- वर्षभर टिकण्यासाठी हवा बंद डब्यात भरावे. ओलसर पणा नसावा..

चिंचेचे सरबत

इमेज
साहित्य :- चिंच, मीठ, जिरेपूड, बर्फ कृती :- वाळलेली चिंच घ्यावी त्यातील चिंचोके काढून घ्यावी नंतर त्यात पाणी घालून भिजत घालावी.. एक तासाने चिंच कुस्करून पाणी गाळून घ्यावे... चिंचेच्या पाण्यात साखर, मीठ, जिरे पूड टाकावी.. बर्फ टाकून थंडगार सरबत सर्व्ह करावे..     

Instant Jilebi

इमेज
वेळ :- १ तास किती व्यक्तीसाठी :- ७ साहित्य:- ११/२ कप मैदा, ३/४ कप दही, ११/२ कप साखर, ११/२ कप पाणी, खाण्याचा रंग, केसर (optional) , खाण्याचा सोडा. कृती :- एका भांड्यामध्ये मैदा आणि दही मिक्स करून घ्या.. त्यामध्ये १/२ कप पाणी घालून व्यवस्थित मिश्रण बनवुन घ्या.. (इडली च्या मिश्रण प्रमाणे).. १० मिनीटे झाकून ठेवा.. तोपर्यंत साखरेचं सिरप बनवून घ्या . त्यासाठी एका कढई मध्ये साखर आणि पाणी घालून मोठ्या आचेवर साखर विरघळून घ्या.. नंतर उकळी आली की २ ते ३ मिनीटे उकळा.. खाण्याचा रंग टाका १ छोटा चम्मच ..साखर चीपचीपी वाटली पाहिजे... बोटाच्या सहायाने साखरेचं सिरप तपासून पाहा.. जिलेबी चे मिश्रण तयार झाले आहेत त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा घाला.. आणि पसरट कढई किंवा frypan मध्ये तेल तापायला ठेवावे.. जिलेबी करण्याची बॉटल, दुधाची पिशवी, पाण्याची बॉटल सुद्धा वापरू शकता.. बॉटल मध्ये जिलेबी चे मिश्रण टाकून जिलेबी तळयला घ्या.. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तळन घ्या आणि लगेच साखरेच्या सिरप मध्ये घाला.. ३,४ मिनीटे झाले की काढून घ्या.. जिलेबी तयार आहे .. टीप:- १. खाण्याचा सोडा चिमुटभर घालावा.  सोडा जास्त...

Useful Kitchen Tips 2

इमेज