पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Instant Jilebi

इमेज
वेळ :- १ तास किती व्यक्तीसाठी :- ७ साहित्य:- ११/२ कप मैदा, ३/४ कप दही, ११/२ कप साखर, ११/२ कप पाणी, खाण्याचा रंग, केसर (optional) , खाण्याचा सोडा. कृती :- एका भांड्यामध्ये मैदा आणि दही मिक्स करून घ्या.. त्यामध्ये १/२ कप पाणी घालून व्यवस्थित मिश्रण बनवुन घ्या.. (इडली च्या मिश्रण प्रमाणे).. १० मिनीटे झाकून ठेवा.. तोपर्यंत साखरेचं सिरप बनवून घ्या . त्यासाठी एका कढई मध्ये साखर आणि पाणी घालून मोठ्या आचेवर साखर विरघळून घ्या.. नंतर उकळी आली की २ ते ३ मिनीटे उकळा.. खाण्याचा रंग टाका १ छोटा चम्मच ..साखर चीपचीपी वाटली पाहिजे... बोटाच्या सहायाने साखरेचं सिरप तपासून पाहा.. जिलेबी चे मिश्रण तयार झाले आहेत त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा घाला.. आणि पसरट कढई किंवा frypan मध्ये तेल तापायला ठेवावे.. जिलेबी करण्याची बॉटल, दुधाची पिशवी, पाण्याची बॉटल सुद्धा वापरू शकता.. बॉटल मध्ये जिलेबी चे मिश्रण टाकून जिलेबी तळयला घ्या.. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तळन घ्या आणि लगेच साखरेच्या सिरप मध्ये घाला.. ३,४ मिनीटे झाले की काढून घ्या.. जिलेबी तयार आहे .. टीप:- १. खाण्याचा सोडा चिमुटभर घालावा.  सोडा जास्त...

Useful Kitchen Tips 2

इमेज

Useful Kitchen Tips

इमेज

बटाटा गुलाबजाम

इमेज
तयारी :- ३० मिनीटे वेळ :- ३० मिनीटे किती लोकांसाठी :- २ साहित्य :-  ३ मध्यम आकाराचे बटाटे , २ मोठे चम्मच मिल्क पावडर, १ वाटी साखर , १/२ वाटी पाणी, वेलची पूड.. कृती :- बटाटे उकडून सोलून घ्यावे.. किसनी वर खिसून घ्यावे.. मिल्क पावडर मिसळून गोळा बनवावा . निंबुच्या आकाराचे गोळे बनवुन सोनेरी रंग येईपर्यंत तेल / तूप मध्ये तळून घ्यावे.. गरम असतानाच पाकात टाकावे.. १/२ तासानंतर खाण्यासाठी घ्यावे.. म्हणजे गुलाबजाम पाकमध्ये नीट मुरतील. साखरेचा पाक :- एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करावे . मोठ्या आचेवर एक उकळी आली की गॅस ची आच मध्यम करावी आणि ५ मिनीटे उकळू द्यावे.. त्यात वेलची पूड घालावी ... बटाटा गुलाबजाम तयार आहे .. टीप :- १. बटाटा उकडून सोलून १ तासांनी वापरावा म्हणजे चिकट होत नाही . २. गुलाबजाम मध्यम आचेवर तळावे .. ३. साखरेचा पाक चीपचीपा हवा.. एक तारी किवा २ तारी नको ..

गाजर हलवा

इमेज
तयारी :- १५ मिनीटे वेळ :- ३० मिनीटे किती लोकांसाठी :- ४ साहित्य :- गाजर १ किलो, दूध पाऊण लिटर , तूप ३ मोठे चम्मच, साखर पाव किलो, सुकामेवा, वेलची पूड.. कृती :- गाजर स्वच्छ धूऊन  वरचे साल काढून किसणी वर किसून घ्यावे.. एका जाड बुडाच्या पातेल्यात एक चम्मच तूप टाकून गाजराचा कीस घालावा.. गॅस ची आच मध्यम ठेवावी.. ३ मिनीटे परतून झाल्यावर परत एक चम्मच तूप घालावे.. २  मिनीटे मध्यम आचेवर परतावे.. त्यात दूध घालून मध्यम आचेवर ५ मिनीटे शिजवून झाल्यावर त्यात साखर घालावी.. साखरेला पाणी सुटेल.. साखर घट्टआणि दूध आटवून गाजर हलवा थोडा घट्ट व्हायला आला की त्यात सुकामेवा आणि वेलची पूड घालावी .. वरून एक चम्मच तूप घालावे.. आणि परत पूर्ण घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे... गाजर हलवा तयार आहे.. टीप :- १. पूर्ण गाजर हलवा मध्यम आचेवर शिजवावा.. २. दूध ऐवजी खवा सुधा वपरू शकता.. ३. सुकामेवा थोड्या तुपावर परतून घेऊ शकता. ४. साखरेचा प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार..

लाल माठ भाजी

इमेज
तयारी :- १५ मिनीटे वेळ :- १० मिनीटे किती लोकांसाठी :- २ साहित्य :- १ जुडी लाल माठ भाजी, १ मोठा कांदा, ४,५ लसूण पाकळ्या, २ हिरवी मिरची, २ चम्मच तेल, १ चम्मच जिरे, १ चम्मच मोहरी, चिमुटभर हिंग,  लाल तिखट (आवडीनुसार), हळद, मीठ (चवीनुसार).. कृती :- लाल माठ भाजी निवडून (फक्त पाने आणि कोवळी देठ) स्वच्छ धूऊन बारीक चिरून घ्यावी.. कढई मध्ये २ चम्मच तेल घालून तेल तापल्यावर जिरे मोहरी हिंग घालावा .. जिरे मोहरी तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा लसूण (किसून) हिरवी मिरची घालावी.. कांदा सोनेरी रंगावर झाला की त्यात लाल तिखट हळद घालावे.. गॅस मध्यम आचेवर करून भाजी घालून घ्यावी.. व्यवस्थित परतून घ्यावी झाकण ठेऊन मध्यम आचेवर ५ मिनीटे शिजवून घ्यावी.. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून परतून गॅस बंद करावा.. लाल माठ भाजी तयार आहे . टीप :- कांदा न घालता फक्त लसूण घालून पण भाजी छान होते . लसूण किसून घालावा.. मीठ शेवटी घालावे कारण भाजी शिजल्यावर आळते त्यामुळे मिठाच प्रमाण कमीजास्त होऊ शकते...

लसुण चटणी

इमेज
वेळ :- १० मिनीटे साहित्य :- २०,२५ लसूण पाकळ्या, तेल २ मोठे चम्मच, धने पावडर १/२ चम्मच, जिरे १/२ चम्मच , दही २ मोठे चम्मच, मीठ चवीनुसार, पाणी.. कृती :- लसूण पाकळ्या सोलून जाडसर ठेचून घ्याव्या... एका वाटी मध्ये तिखट धने पावडर आणि पाणी घालून पेस्ट बनवून घ्यावी.. कढई मध्ये तेल घालून जिरे घालावे जिरे तडतडले की  ठेचलेला लसुण घालावा मध्यम आचेवर सोनेरी रंगावर परतून घ्यावा... नंतर तिखट पेस्ट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ३ मिनीटे शिजवून घ्या.. नंतर दही घाला आणि मीठ घालुन १ मिनिट शिजवावे.. गॅस बंद करावा.. लसूण चटणी तयार आहे.. टीप :- १. चटणी साठी लसूण ठेचून च वापरावा.. २. मसाल्याची पेस्ट बनवा म्हणजे मसाले तेलामध्ये जळत नाही...